file photo 
नागपूर

मूलबाळ होत नसल्यामुळे विवाहितेची आत्महत्या 

अनिल कांबळे

नागपूर : दहा वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली. दोघांत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या सहमतीने दोघांनी प्रेमविवाह केला. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. मात्र, मूलबाळ होत नसल्यामुळे दोघेही निराश होते. याच कारणाने ती तणावात राहू लागली. यातून तिने दुर्दैवी निर्णय घेतला.

नैराश्‍यात असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि एका प्रेमविवाहाचा करुण अंत झाला. ही दुर्दैवी घटना हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. संगीता कुणाल कांबळे (वय २९, न्यू नेहरूनगर) असे आत्महत्या केलेल्या वाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल कांबळे महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनावर काम करतात. त्यांची दहा वर्षांपूर्वी संगीता या उच्चशिक्षित तरुणीशी ओळख झाली. दोघांचे सूत जुळले. प्रेमविवाह केल्यानंतर दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. मात्र, मूलबाळ होत नसल्यामुळे दोघेही निराश होते. त्यासाठी त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडे उपचारही घेतले. 

दरम्यान, कुणाल याला दारूचे व्यसन जडले. तो नेहमी दारू पिऊन घरी यायला लागला. त्यामुळे घरात पती-पत्नीत वाद होऊ लागले. नातेवाइकांनी समजूत घातल्यानंतर वाद निवळला. कुणालने दारूही सोडली. दुसरीकडे, मूल होत नसल्याने संगीता नाराज राहायला लागली. एकलकोंडी झालेल्या संगीताच्या स्वभावात फरक पडला. नशिबाला दोष देत संगीताने आत्महत्येचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी कुणाल कामावर निघून गेले आणि तिचे सासरे फिरायला बाहेर गेले. या वेळात संगीताने घरात सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली. 

सायंकाळी कुणाल घरी आला. त्याने संगीता यांना हाक दिली. प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून डोकावून बघितले असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. संगीताला खाली उतरवून मेडिकलमध्ये नेले. हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सासऱ्यांशी झाला वाद
पोळ्याच्या पाडव्याला कोणत्यातरी कारणावरून संगीताचा सासऱ्यासोबत वाद झाला होता. तेव्हापासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. या गोष्टीवरून घरातील वातावरण बिघडले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

(संपादन : मेघराज मेश्राम)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT